छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकीय कल्पना अशा होत्या की त्यामध्ये काहीही बदल न करता आपण आजही त्यांचे अनुकरण करू शकतो. आपल्या प्रजेला शांतता, सहिष्णुता, सर्वांना समान संधी, कार्यक्षम आणि शुद्घ राज्यकारभार पद्धती, व्यापार वृद्धीसाठी आरमार आणि मायदेशाच्या रक्षणासाठी लढाऊ लष्कर ही त्यांच्यासमोर ध्येये होती. महाराष्ट्रातीलच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरच्या व्यक्तीसही त्याच्याजवळ गुणवत्ता असेल तर शिवाजी महाराजांकडे काम करण्याची संधी प्राप्त होई. महाराजांची कार्यपद्धती ही सर्व क्षेत्रांना स्पर्श करणारी असल्यामुळे आधुनिक राज्याचे ध्येय दृष्टीसमोर ठेऊन त्यांना प्रजेची सर्वांगीण उन्नती करता आली. अशा सर्व गोष्टींचा ऊहापोह डॉ. केदार महादेवराव फाळके यांनी या व्याख्यानमालेमध्ये केलेला आहे.